Monday, December 23, 2024
Homeराज्यअरविंद बाबू देशमुख महाविद्यालयामध्ये आभासी पद्धतीने इंग्रजी विभागाचे व्याख्यान...

अरविंद बाबू देशमुख महाविद्यालयामध्ये आभासी पद्धतीने इंग्रजी विभागाचे व्याख्यान…

नरखेड – अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील इंग्रजी विभागाच्या वतीने इंडियन अप्रोच इन लर्निंग इंग्लिश या विषयावर आभासी पद्धतीने दिनांक 10 मार्च 2023 रोजी व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रकाश पवार सर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री सुहास मोरे सर सहाय्यक प्राध्यापक एस पी एम विज्ञान आणि गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय घाटंजी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनामध्ये मोरे सरांनी असे म्हटले की, भारतातील विविध राज्यांमध्ये, विविध महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विषयाचे पोषक वातावरण बनविणे अत्यंत गरजेचे आहेत आणि आपल्याला इंग्रजी शिकण्याकरता तसे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. इंग्रजी शिकताना येणाऱ्या विविध अडचणींना कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाची समाधान केले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आशिष काटे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: