Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसट्टापट्टी लिहिणाऱ्या दोघांना अटक...

सट्टापट्टी लिहिणाऱ्या दोघांना अटक…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे सार्वजनिक स्थळी अवैधरीत्या सट्टापट्टी लिहिणाऱ्या दोन आरोपींना जलालखेडा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून रोख ५,५३० रुपये व सट्टापट्टी लिहिण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई जलालखेडा बसस्थानक परिसरात करण्यात आली.

गणेश शेषराव कांबळे (३६) व गजानन वासुदेव काटोलकर (३२, दोघे रा. जलालखेडा, ता. नरखेड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जलालखेडा पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, जलालखेडा बसस्थानक परिसरात अवैधरीत्या सट्टापट्टी लगवाडी केली जात असल्याची सूचना मिळताच पोलिसांनी परिसरात पाहणी करीत धाड टाकली.

यात दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सट्टापट्टी लिहिण्याचे साहित्य व रोख ५,५३० रुपये जप्त करण्यात आले.

याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास दिनेश जोगेकर करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात अनिल जोशी, राजेश कोल्हे, हरिहर सोनोने, किशोर कांडेलकर यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: