Monday, December 23, 2024
Homeराज्यपिंजर पोलिसांनी केली अटक | अकरावी पास बंगाली युवक बनला तोतया डॉक्टर...

पिंजर पोलिसांनी केली अटक | अकरावी पास बंगाली युवक बनला तोतया डॉक्टर…

अकोला – ग्रामीण भागात काही तोतया डॉक्टरांनी आपला व्यवसाय मांडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे, असाच एक तोतया डॉक्टर बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही या गावात गेल्या सहा महिन्यापासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता, सोमवारी पिंजर पोलीस अचानक तोतया डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचले, पाठोपाठ वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम सुद्धा दाखल झाली, सोमवारपासून ताब्यात असलेल्या तोतया डॉक्टरची मंगळवारी आरोग्य पथकाने पूर्ण छानबिन केली, तेव्हा हा तोतया डॉक्टर केवळ अकरावी पास असल्याचे निष्पन्न निघाले आहे,

त्यावेळी उपस्थित आरोग्य विभागालाही त्याचा धक्का बसला, याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्या आणि त्यांची सर्व टीम चौकशी करीत आहे, पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली असून या प्रकारामुळे बार्शीटाकळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत सावध राहून आपल्या गावात असलेल्या बोगस डॉक्टरची चौकशी करावी आणि व त्याची पोलिसांना माहिती द्यावी ,असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे,

विश्वजीत मृत्युंजय विश्वास वय 21 वर्ष, राहणार हैदर बेलीया, पोलीस स्टेशन हाबरा, जिल्हा बराशात (कलकत्ता) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे, प्राप्त माहिती नुसार एका लोक प्रतिनिधीच्या निकटवर्तीयाने पिंजर पोलिसांना या बोगस डॉक्टरची माहिती दिली, त्यामुळे पोलीस बोगस डॉक्टरच्या निवासस्थानी पोहोचले, ठाणेदार गंगाधर दराडे यांनी या प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला दिली, त्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व आरोग्य पथकाची टीम सारकिन्ही गावात दाखल झाली,

डॉक्टरची पूर्ण झाडाझडती घेतली, प्रमाणपत्राची तपासणी केली, परंतु तो डॉक्टर असल्याचे तसे अधिकृत कागदपत्र काही आढळले नाही, उलट हा विश्वजीत बिश्र्वास केवळ अकरावी पास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली, या तोतया डॉक्टरकडे मुदत संपलेले इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, औषधी बाटल्या, त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सावधानता बाळगून आपल्या जीवाशी खेळत असलेल्या अश्या बंगाली बोगस डॉक्टरला हुडकून काढावे , त्याच्याकडे असलेल्या प्रमाणपत्राची, कागदपत्राची पाहणी करावी, बोगस आढल्यास पोलिसांना आणि आरोग्य विभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: