नांदेड – महेंद्र गायकवाड
भोकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. १३ जुलै २०२३रोजी देशद्रोही वक्तव्य करून धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांची जाहीर सभा होत असल्याने भिडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या दिलेल्या निवेदनात असे म्हटले की संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी)हा देशाचा राष्ट्रध्वज बदला,भारत देशाला हिंदूराष्ट्र करा, देशाचे स्वातंत्र्य मान्य नाही म्हणून वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत.
हे त्यांचे वक्तव्य म्हणजे राष्ट्रद्रोही,धार्मिक सामाजिक भावना भडकावणारे परिणामी दंगल घडविणारे आहेत भारत देशात अनेक जाती धर्माची लोक राहतात मग त्या त्या धर्माच्या लोकांनी देशाला त्यांच्या धर्माचे नाव देण्याची मागणी करतील!एकेकाळी पंजाबमध्ये भिद्रानवाले या दहशतवाद्यांनी खलिस्तानची मागणी केली होती.
तेव्हा देशात अराजकता माजली होती,या गंभीर बाबीचा विचार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने केला पाहिजे! संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते!भोकर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर भोकर तालुका वंचित आघाडीचे अध्यक्ष सुनील कांबळे, तालुका उपाध्यक्ष गोकुळ राठोड,जेष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे,तालुका उपाध्यक्ष पुंजाजी डोखळे,शहर अध्यक्ष शेख अजीम,महासचिव सुमेश फुगले,उपाध्यक्ष बालाजी बाभळे, माणिक जाधव,चंद्रकांत चव्हाण, शेख शब्बीर, सत्यपाल कदम,सचिव गजानन साखरे,राजू दांडगे,तुळशीराम कदम,मधुकर तारू आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.