रामटेक – राजू कापसे
संभाजी भिडे हे सतत राष्टपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहर नेहरूजी यांचेवर वादग्रस्त वक्तव्ये करून अपमानीत करण्याचा सतत प्रयत्न करीत असल्याने संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावे व मणिपुर राज्यातील माथेफीरू लोकांनी दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढली त्या विरोधात मणिपूर येथील भाजप सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी व पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी काल दि. ३१ रोज सोमवाराला काँग्रेस कमेटीच्या वतीने जाहीर निषेध करीत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने चंद्रपालजी चौकसे पर्यटक मित्र रामटेक, दुधरामजी सव्वालाखे (जि.प. सदस्य नागपूर), श्रीमती. शांताताई कुंभरे (जी.प.सदस्या नागपूर), सौ.कलाताई ठाकरे (माजी पं.स. सभापती रामटेक), सौ.अश्विताताई बिरणवार (पं.स.सदस्य रामटेक),असलम शेख (अध्यक्ष,नागपुर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग), दामोधरजी धोपटे (अध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी), नितिनजी भैसारे ( कार्याध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमीटी), पी.टी.रघुवंशी (ज्येष्ठ काँग्रेस नेते रामटेक) यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौक रामटेक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून निषेध मोर्चा काढण्यात आला व रामटेकच्या उपविभागीय अधिकारी सौ. वंदना सावरंगपते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाऊराव राहाटे,अश्विन ठाकुर,सलीम मालाधारी,बबलू दुधबर्वे,अश्विन सहारे, मोहन कोठेकर, सुशांत राळे, अभिषेक डहारे, अविनाश कोल्हे, तुलाराम मेंढे, सौ. शारदाताई बर्वे, सौ. शोभाताई राऊत, सौ. पुष्पाताई बर्वे, सौ. शहिस्ताताई पठाण, आम्रपाली भिवगडे, पुष्पाताई धोपटे, विमलताई नागपुरे, स्नेहदीप वाघमारे, अजय खेडकर, शिवराम महाजन, रामदास दुंडे, अनिल बंधाटे, अशोक गुरव, अन्नू बेग, भीमा नागपुरे, राजेंद्र चकोले, योगेश उके, मंगल चांदेकर, बापूराव नगरे, संजय बागडे, प्रकाश आंबीलढुके, शाम पगाडे, अजय उपासे व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.