दिनांक १८/०२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मोशी हद्दीत मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याचे सिमेवर असलेले तिर्थक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचे दृष्टीने विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुध्दा सदर परिसरामध्ये गस्त करून अवैध धंदयांना आळा घालण्याबाबत मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी आदेशीत केलेले आहे.
सालबर्डी येथे सुरू असलेल्या यात्रेत महाराष्ट्र राज्याचे सिमे अंतर्गत आरोपी नामे ईश्वरसिंग बावरी, वय २० वर्षे, रा. तळेगांव (श), ता. आष्टी, जि. वर्धा हा अवैधरित्या लोखंडी घातक शस्त्र विक्री करित असल्याचे यात्रेत गस्त करित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गोपनिय माहीती प्राप्त झाली होती.
प्राप्त माहीतीचे आधारे पथकाने सदर बाबीची शहानिशा करून आरोपी विक्री करित असलेल्या जागेवर धाड टाकली असता आरोपीने विक्री करिता साठवून ठेवलेले लोखंडी ३० कटयार, ४९ गुप्ती तसेच ०६ रामपुरी चाकु तसेच सदर शस्त्र तयार करण्या करिता वापरण्यात येणारे लोखंडी हाथोडे-२, एैरण व लोखंडी कोरणे असा एकुण ३४०००/- रूचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. तसेच डॉ. श्री. निलेश पांडे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी यांचे मार्गदर्शनात श्री. तपन कोल्हे, पोलीस निरिक्षक, स्था. गु. शा. अमरावती तसेच श्री श्रीराम लांबाडे, पोलीस निरिक्षक, पो.स्टे मोशी यांचे नेतृत्वातील संयुक्त पथकामधील पो.उप.नि. श्री. संजय शिंदे,मुलचंद भांबुरकर,
पोलीस अमंलदार सुनिल महात्मे, पुरूषोत्तम यादव, सैय्यद अजमत उमेश वाकपांजर, मंगेश लकडे, चन्द्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, अमोल केन्द्रे, निलेश खंडारे व चालक संदीप नेहारे व पो.स्टे. मोर्शी येथील पोलीस अमलदार यांनी केली आहे. पुढील कायदेशिर कार्यवाहीस्तव आरोपीस जप्त मुद्देमालासह पो.स्टे. मोर्शी पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.