Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीकागल येथे रागाने बघितल्याने दोन गटात वाद...चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल..,

कागल येथे रागाने बघितल्याने दोन गटात वाद…चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल..,

कागल ; प्रतिनिधी…

कागल येथे दि.5 रोजी रागाने का बघितलं या कारणावरून दोन गटात भांडण झाले असुन यामध्ये चार जणांविरुद्ध कागल पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.या बाबत पोलीसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की येथील शाहू नगर येथील रहिवासी अमन रियाज शेख (वय 21) व त्याचे मित्र विश्वजीत संतोष सुतार आणि पार्थ अशोक कोरवी हे कोल्हापूर येथून दांडिया खेळून रात्री 12.40 च्या दरम्यान आले होते.

आपल्या मित्रांना घरी सोडण्यासाठी जात असताना ते कागल येथील रत्ना मेडिकल येथे आले असता काही अज्ञात आरोपींनी अमन याची गाडी थांबवून रागाने का बघत होतास यावरून वाद झाला होता.यामध्ये त्यांना दगडाने मारहाण करून अमन यांच्या गळयातील सोन्याची चेन काढून घेतली आहे अशी फिर्याद अमन रियाज शेख याने कागल पोलिसामध्ये दिली आहे.

या दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलमानुसार 307, 327,342 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्हयातील आरोपींची नावे निलेश रविंद्र पाटील,अफताब शौकत जमादार,अजित अमोल नाईक आणि विश्वजीत नंदकुमार डुबल सर्व रा. कागल अशी आहेत.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाचकौरे करत आहेत..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: