पातूर – निशांत गवई
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत शिर्ला गावामधील नॅशनल हायवे क्रमांक १६१ पासून ते गावापर्यंतच्या हद्दीतील १.५ किलोमीटर रस्ता प्रस्तावित आहे.संबंधित कंत्राटदाराने कामाची मुदत संपेपर्यंत २०० ते २५० मिटर नाली खोदकाम केल्याशिवाय कोणतेही काम केले नाही, संबंधित बांधकाम विभागाने कामाची मुदत संपल्यानंतर कामाच्या अंदाजपत्रकाचे रोड साईडला फलक लावले,
त्याबाबत गावकऱ्यांनी बांधकाम विभागाला विचारणा केल्यानंतर जुन्या रोडची जेसिबीच्या सहाय्याने दोन तीन इंचाची उखराउखरी केली आणि दबाई न करता पहिला थर टाकला त्यावर माती मिश्रित मुरूम अत्यल्प प्रमाणात टाकला कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे नाली खोदकाम केले व खोदकामाची मातीचा ढिग रोडलाच लागून टाकला.त्यामुळे पावसाळ्यात येता-जाता गावकऱ्याचे प्रचंड हाल झाले काम हे संपूर्ण कालावधी संपून सुद्धा काम अत्यंत संथगतीने चालू आहे.
रस्त्याच्या रुंदी मध्ये कुठेच समानता नाही.अंदाजपत्रकाच्या फलकानुसार दोन थरांची उंची असायला हवी तेवढी दिसून येत नाही. खडी व मुरूम बिछाई केल्या नंतर त्यावर रोलरने दबाई केल्या जात नसून रोलर हे शोभेसाठी उभे केलेले असते त्यामुळे रोडची दबाई न करता जास्तीची उंची दाखविण्यात येते.
तरी ह्या बाबत चौकशी करण्यात यावी. तसेच रोडची रुंदी काही ठिकाणी तीन मीटर ची आहे व काही ठिकाणी अंदाजे सहा मीटरची रुंदी आहे तरी पूर्ण दीड किलोमीटर पर्यंत रोडची रुंदी सहा मीटर सारखीच घेण्यात यावी.तसेच नवीन हायवे रोड झाल्यामुळे गावात येण्या व जाण्यास दोन वेगवेगळे रस्ते तयार झाले आहेत.
तरी दक्षिणेकडील रस्ता सुद्धा दुरुस्त करण्यात यावा. सदर कामावर बांधकाम विभागाचे कर्मचारी कामाकडे फिरून पाहत नाही. संबंधित बांधकाम विभागात चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत, संबंधित कंत्राटदार गावकऱ्यांना जुमानत नाही.
आणि बांधकाम विभागसुद्धा गावकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत अशी तक्रार शिर्ला येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना केली.सदर तक्रार अर्जावर निखिल खंडारे,युवराज इंगळे,मनोज हानोरे,अंबादास म्हैसने,विरेंद्र भाजीपले,रघुनाथ इंगळे,सिद्धार्थ गोपणारायण,जीवन इंगळे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.