Monday, December 23, 2024
Homeराजकीयग्रामसेवकांचा मनमानी कारभार - नागरिक व ग्राम सदस्य त्रस्त...

ग्रामसेवकांचा मनमानी कारभार – नागरिक व ग्राम सदस्य त्रस्त…

  • गट विकास अधिकाऱ्याकडे केली तक्रार.
  • संगीता घुरडे असे ग्राम सेविकेचे नाव.
  • जामगाव (खुर्द) ग्राम पंचायत मधील प्रकार.
  • झालेला खर्चाचा व जमा रकमेचा हिशेब देत नसल्याचे सदस्यांचा आरोप.
  • ग्राम पंचायत कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिक त्रस्त..

नरखेड तालुक्यातील जामगांव (खुर्द ) येथील येथील ग्रामसेविका संगीता घुरडे मनमानी कारभार करता असल्याचे आरोप ग्राम पंचायत सदस्य व नागरिक यांनी केला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी कार्यवाही करून सुद्धा अजून पर्यंत साधी चौकशी सुध्दा करण्यात आली नसल्याचे ग्राम पंचायत सदस्य सुधाकर खजुरिये यांनी यांनी सांगितले. जामगाव (खुर्द) गट ग्राम पंचायत असून यात जामगाव (खुर्द), करजोली, जोलवाडी, रानवाडी, पानवाडी अशा पाच गावाचा समावेश आहे.

एप्रिल 2022 पासून ग्रामसेवक या पदावर संगीता घुरडे कार्यरत असून त्या ग्राम पंचायत कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. गट ग्राम पंचायत असल्यामुळे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरिकांना कागद पत्रासाठी ग्राम पंचायत येथे यावे लागते परंतु ग्राम सेवक कार्यालयात हजर नसल्यामुळे परत जावे लागते. त्यामुळे नागरिकांची कामे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्याच प्रमाणे ग्राम पंचायत सदस्यानं मासिक सभेत खर्चा बाबत माहिती देत नसून उडवा उडवीची उत्तरे देतात त्याच प्रमाणे तुम्हाला हिशेब मागण्याचा अधिकार नसल्याचे ग्राम सेवक म्हणतात. असा आरोप ग्राम पंचायत सदस्य सुधाकर खजुरिये, सुभाष काळबांडे, आरती जुगसेनिये, नंदिनी खजुरीये यांनी केला आहे. ग्राम पंचायत सदस्याना जर इतका त्रास ग्राम सेवक देत असेल तर नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल असा प्रश्न विचारल्या जात आहे.

ग्राम सेवक व्यवस्थित रित्या काम करता नसल्या बाबतची तक्रार दोन महिन्यापूर्वी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती परंतु अजून पर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. येत्या सात दिवसांच्या आत चौकशी करण्यात आली नाही तर ग्राम पंचायत सदस्य व नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य सुधाकर खजुरीये यांनी दिली आहे. तसेच याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राम पंचायत सदस्य यांनी लावलेला आरोप खोटा असून. मी नियमित ग्राम पंचायत कार्यालयात हजर राहते. तसेच मासिक सभेत जमा खर्चा बाबतची सर्व माहिती सभेत सदस्यानं समोर ठेवते. संगीता घुरडे ग्रामसेविका गटग्राम पंचायत जामगाव (खुर्द)

ग्राम सेविका मनमानी कारभार करत असून कार्यालयात हजर राहत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. गट ग्राम पंचायत असल्यामुळे इतर गावातील नागरिक कामाकरिता 2 ते 3 किलोमीटर वरून यावे लागते. परंतु ग्राम सेविका नसल्यामुळे त्यांना परत जावे लागते.

तसेच मासिक सभेत जमा खर्चा बाबत विचारणा केली असता उडवा उडविची उत्तरे देतात. याबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सात दिवसात कार्यवाही न झाल्यास नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल. सुधाकर खजुरीये ग्राम पंचायत सदस्य जामगाव (खुर्द).

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: