मूर्तिजापूर शहरातील आयसीआयसीआय लेम्बोर्ड पिक विमा कार्यालयाची उद्धव ठाकरे शिवसेनेच्या काही कार्यकत्यांनी तोडफोड केली होती, या प्रकरणी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणात अप्पू तिडके यांना जामीन मिळाला आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अप्पू उर्फ मोहित गजाननराव तिडके हे शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) असून ते माजी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. त्यांची शेतकरी कष्टकरी गोर गरीब यांचे कैवारी अशी प्रतिमा संपूर्ण शहरामध्ये निर्माण झालेली असून, शेतकरी व मजदूर वर्गाच्या हक्काकरिता ते नेहमीच लढत राहतात व त्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा नावलौकिक आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमिनीचे पिक नष्ट झाले तरी मात्र पीक विमा मदत व महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहन योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने येथील पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती.
अशा प्रकारच्या अनेक तक्रारी अप्पू तिडके यांना प्राप्त झाल्या, त्यावरून त्यांनी आपले साथीदार देवाशिष भटकर व इतर कार्यकर्त्यांसह थेट पीक विमा कार्यालयास गाठले व तेथे फिल्मी स्टाईल आंदोलन केले त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की तात्काळ बरेच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला व अजूनही मिळत आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना त्यांचा विम्याची रक्कम मिळत असल्याने सर्वत्र अप्पू तिडके देवाशिष भटकर, अक्षय लकडे, वकास चाऊस, कुरील यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
त्यानंतर वरील प्रकरणांमध्ये मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन येथे अप्पू तिडके देवाशिष भटकर व इतर कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केली व नुकसान केले अशा आशयाची तक्रार प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी अप्पू तिडके व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळताच दिनांक २४/११/२०२२ अप्पू तिडके देवाशिष भटकर व इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे वकील ॲड. सचिन वानखडे यांच्यासह पोलीस स्टेशन गाठले व पुढील कार्यवाही म्हणून पोलिसांनी त्याच दिवशी त्यांना न्यायालया समक्ष हजर केले. त्यानंतर आरोपींच्या वतीने जमानत अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला पोलिसांनी जमानातीस विरोध केला परंतु न्यायालयाने अप्पू तिडके देवाशिष भटकर यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला.
वरील सर्वांकरिता ॲड. सचिन वानखडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.