गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया – बनगांव प्रादेशिक पाणी पुरवटा योजना ही जिल्हा परिषद मार्फत चालविण्यात येत असुन सदर योजनेची पाणीपट्टी कर अंदाजे 3 कोटी 39 लक्ष वसूली करीता थकीत आहे. यामुळे योजनेची वि देयके व किरकोळ देखभाल दुरुस्ती वेळीच वसुली अभावी विभागाच्या वतिने करणे शक्य होत नाही.
परिणामी विद्युत पुरवठा विद्युत विभागाच्या वतिने खंडीत करण्यांत आल्याने सदर योजना बंद होत असते सदर योजनेतून ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामीण जनतेला उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण होत आहे. सध्यास्थितीत सदर योजना बंद असून मा. अध्यक्ष जि.प. पंकज रहांगडाले, यांनी पुढे दिवाळीचा सण असल्याने ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात योजना पूर्ववत सुरु करण्यास तत्वत: मंजुरी दिलेली आहे.
सदर योजनेतून ज्या ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यांत येते अशा ग्रामस्थानी पाणी पट्टी कर दिवाळीपूर्वी भरण्याचे आव्हान केले आहे. दिवाळीपूर्वी सदर ग्रामपंचायतीने थकीत पाणी देयके न भरल्यास ज्या ग्रामपंचायतची वसुली 80 टक्के पेक्षा कमी आहे त्या ग्रामपंचायतीचे पाणी पुनश्च बंद करण्यात येईल.
जेणे करुन सदर योजना सुरळीत सुरु राहून योजनेतून नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होईल. सदर योजना ही सौर उर्जा आधारीत करण्याचा कार्यवाही प्रगती पथावर असून यामुळे योजनेची विद्युत देयके भरण्याची बचत होणार आहे.
कृपया सदर योजनेच्या माध्यमातून ज्या गावांना पाणी पुरवठा करण्यांत येते त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तथा सन्मा सदस्य यांनी पाणी पट्टी वसुलीच्या संबंधाने आपल्या स्तरावर ग्रामीण जनतेला पाणी पट्टी वेळीच भरणा करण्याबाबत सुचित करावे अशी विनंती वजा सूचना केली आहे.