सांगली – ज्योती मोरे
सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नियुक्ती जशी गरजेची आहे, तशी स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करणे आवश्यक आहे. कारण, स्वच्छता असेल तरच रुग्ण लवकर बरा होईल.
परंतु, सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया करण्याचा आदेश आठ महिन्यापूर्वी देऊनही या प्रशासनाने या नियुक्तया केल्या नसल्याने येत्या १५ दिवसात या नियुक्त्या न झाल्यास शिवसेना स्टाईलने सदर नियुक्त देण्यास हॉस्पिटल प्रशासनाला भाग पाडू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिला आहे.