Sunday, December 22, 2024
Homeराज्यज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविले...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविले…

अकोला – संतोषकुमार गवई

१३ डिसेंबर २०२३ व दि. ११ मार्च २०२४ नुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४-२५ सत्रापासून कार्यान्वीत करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या,आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.

अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असून योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. सविस्तर अटी व शर्ती बाबतचा शासन निर्णय दि. ११ मार्च २०२४ शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: