Sunday, December 22, 2024
Homeराज्यज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागस प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” शासन निर्णय 13 डिसेंबर 2023 नुसार लागु करण्यात आलेली आहे.

“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” हे तातडीने अंमलबजावणी करावी, त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी या योजनेचा अर्ज करावा, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसाईक व बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात, व्दितीय वर्षात, तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या योजनेचा अर्ज करावा.

या योजनेचा अर्ज हा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजुस नांदेड या ठिकाणी संपर्क साधुन विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घेऊन सदरचे अर्ज व्दितीय, तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी 15 जुलै 2024 पुर्वी या कार्यालयात सादर करावेत, व प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना टिकूण राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे, विद्यार्थी / विद्यार्थीनिंना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देणे या दृष्टीकोणातून उच्च शिक्षण घेण्याऱ्या मुला-मुलींसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” ची अमलबजावणी करणे बाबत निर्देशित करण्यात आले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: