Saturday, December 21, 2024
Homeराज्यअकोला | बँक खात्यांशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन...

अकोला | बँक खात्यांशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन…

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला – संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थी यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा,असे आवाहन अकोट तहसिलदार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येणार नाही, असे आवाहन तहसिलदार डॉ. सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: