Monday, December 23, 2024
Homeराज्यमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन...

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षासाठी वैयक्तीक व संस्थेसाठी असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. या दोन पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव बुधवार 15 मार्च 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव चारित्र्य प्रमाणपत्रासह सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराची नियमावली 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. यानुसार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन, साहित्यिक क्षेत्रात काम करत असलेले व्यक्ती, संस्थेच्या कामाची दाद/दखल घेऊन त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजातील समाजसेवक, कलावंत,

समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्यिकांनी पुढे यावेत या उद्देशाने हा पुरस्कार व्यक्ती व सामाजिक संस्थेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नियमावली बाबत 8 मार्च 2019 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: