नांदेड – महेंद्र गायकवाड
प्राचीन वैभव,संस्कृती हा आपला अमूल्य व ऐतिहासिक ठेवा आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळून देशाभिमानाचे स्फुलिंग पेटते.त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन करून त्याची जोपासना करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांनी रविवारी येथे बोलताना केले.
होमगार्ड संघटनेच्या 86 व्या होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह निमित्त नांदेड पथकाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या समारोपप्रसंगी नंदगिरी किल्ला येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी केंद्रनायक अरुण परिहार,समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,कंपनी नायक डॉ.अनिल पाटील,कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार,कंपनी नायक रामराव क्षीरसागर,कंपनी नायक सुलतान बेग,कंपनी नायक स.बलबिरसिंघ स. चरणसिंघ,वरिष्ठ पलटन नायक रवि जेंकूट,वरिष्ठ पलटन नायक बी.जी.शेख,वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे,कंपनी सार्जंट मेजर मिलिंद गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की,नांदेड शहरात सचखंड गुरुद्वारा साहिब जगप्रसिद्ध आहे.त्याचबरोबर नंदगिरी किल्ला हा इतिहासाची साक्ष असलेला व प्राचीन वैभव असलेला किल्ला आहे.
अशा अनेक प्राचीन व ऐतिहासिक वास्तू नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत.त्याचे संवर्धन करून हा अमूल्य प्राचीन ठेवा सर्वांनी जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे,असे सांगून ते म्हणाले की,नांदेड जिल्हा होमगार्ड दलाला गौरवशाली परंपरा आहे.पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड पोलिसांपेक्षा कमी नाहीत.उच्चशिक्षित तरुणांचा ओढा आज होमगार्ड संघटनेत दाखल होण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहे.हे संघटन आता मजबूत झालेले आहे.
सर्वांनी निष्ठापूर्वक व सचोटीने काम करताना आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.आरोग्य जर सुदृढ राहिले तर आपण दीर्घकाळ काम करू शकतो याची जाणीव सर्वांनी ठेवून वाटचाल करावी असे आवाहन सुरज गुरव यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.
प्रारंभी होमगार्ड संघटनेचे संस्थापक माजी पंतप्रधान स्वर्गीय मोरारजीभाई देसाई यांच्या प्रतिमेस अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्यासह उपस्थित होमगार्ड अधिकारी यांनी पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर नंदगिरी किल्ल्यातील सर्व भागांमध्ये साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुरुष व महिला होमगार्ड यांनी पाच तास श्रमदान करून नंदगिरी किल्ला परिसर सुशोभित केला.
या मोहिमेत अनायुक्त अधिकारी नरेंद्र जोंधळे,धम्मानंद सावंत,प्रदीप देशपांडे,सय्यद इम्रान अली,शेख चांद पाशा,रविराज कोकरे,माधव कोमटवार,सुनिता पाटील,छाया वाघमारे,ॲड. माया खाडे यांच्यासह नांदेड पथकातील बहुतांश होमगार्ड सहभागी झाले होते.
नंदगिरी किल्ल्याच्या किल्लेदारांचा देखील सहभाग
आज नंदगिरी किल्ला साफसफाई व स्वच्छता मोहीम अभियानात या किल्ल्याचे किल्लेदार शिवाजी शिंदे,गंगाप्रसाद पवार,अर्जुन नागेश्वर,नारायण जाधव,प्रदीप टाक, मंतुरी विनय,श्रीनिवास वाघ,नरसिंग मुरकुटे,करण वासमवार,शुभम राजपूत, जयेश भरणे,रोहित ढगे, ओमऋतुध्वज कदम, ऋतिक नरडेले, आदित्य नागेश्वर, अक्षय डाकोरे आदी सहभागी झाले होते.