कोकणातील रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन चांगलेच पेटले असून स्थानिक नागरिक महिला मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. यावेळी आंदोलनकर्त्या महिला रखरखत्या उन्हात चक्क जमिनीवर झोपून आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन उठविण्यासाठी पोलीस आंदोलनकर्त्यांवर दबाव टाकीत आहे. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणा-या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे. असे ट्वीट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का ? असा प्रश्न यावेळी बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला केला आहे.
तर यावर संजय राऊत यांनीही एक Video ट्वीट करीत लिहले…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत.. आणि इकडे कोकणातील बारसु येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता.हा काय प्रकार आहे?