Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीयवतमाळ न.प.ची प्लॅस्टिक विरोधी मोहीम सुरू...प्लॅस्टिक जप्तीसह ५ हजार रुपये दंड वसूल...

यवतमाळ न.प.ची प्लॅस्टिक विरोधी मोहीम सुरू…प्लॅस्टिक जप्तीसह ५ हजार रुपये दंड वसूल…

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात एकल प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली असुन वापरकर्ते व विक्रेत्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या राज्य शासनाच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार यवतमाळ न.प. चे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनात न.प.च्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने आज शहरातील दत्त चौक परिसरात धडक मोहीम राबवुन शेकडो किलो प्लॅस्टिकचे फुलहार-तोरण, पन्नी व कॅरी बॅग जप्त करुन व्यापाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

नगर परिषद यवतमाळच्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने शहरातील दत्त चौकातील भाजीबाजारासह मेनरोडवरील नाॅव्हेल्टी जनरल स्टोअर्समध्ये जाऊन तपासणी केली.दरम्यान या कार्यवाहीत फळ विक्रेते जनरल स्टोअर्स मधुन प्लॅस्टिक फुल-हार तोरण मिळुन ७५ किलो प्लॅस्टिक पन्नी व बंदी असलेल्या कॅरी बॅगचा बेकायदेशीर साठा जप्त केला. या कार्यवाही दरम्यान व्यापाऱ्यांना ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्याऱ्या या पथकात उपमुख्याधिकारी ममता राठोड, का.अ. अजय गहेरवाल,आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधु, राहुल पळसकर, व अमोल‌ पाटील, भुषण कोटंबे, आरोग्य विभागातील वार्ड शिपाई आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: