Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअकोला शहरात पुन्हा हत्या !...हत्येच्या मालिकांनी शहर हादरले...

अकोला शहरात पुन्हा हत्या !…हत्येच्या मालिकांनी शहर हादरले…

अकोला शहरात काल शिवसेना उपशहर प्रमुखाची हत्या होत नाही तोच आजही शहरात एक हत्याकांड घडल्याचे समीर आलंय. घटना जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हमजा प्लॉट येथे घडली असून अमीन खान अमीत खान वय 30 वर्षे नामक व्यक्तीची आपसी हेवेदाव्यातून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मागोमाग एक हत्येच्या घटना घडत असल्याने अकोला चांगलेच हादरले आहे.

शहरातील ही 24 ऑक्टोबर पासून एका आठवड्यात लगातार हत्येची चवथी घटना घडली असून नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेच्या निमित्ताने उमटल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हमजा प्लॉट येथे आज रात्री 8.30 ते 8.45 वाजताच्या सुमारास भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या भगत वाडी गल्ली नं. 6 मधील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय अमीन खान अमीत खान याची अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात येवून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून जुने शहर पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. मृतक अमीन खान अमीत खान वय 30 वर्षे यास जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात घटनेनंतर पाठविण्यात आले असता नातेवाईकांचा चांगलाच आक्रोश सुरू होता.

या हत्येसारख्या घटनांनी शहरवासी चांगलेच धास्तावले असून भीतीचे वातावरण पसरले असून शहरात पोलीसांचा वचकच संपल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: