इंडिया टुडे सर्व्हे : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आज झाल्या तर कोणाला किती जागा मिळतील? काँग्रेससह 26 विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी टक्कर देऊ शकेल का? या प्रश्नांबाबत इंडिया टुडेने सर्वेक्षण केले असून त्यात एनडीएच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. जाणून घ्या सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात.
इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनचे हे सर्वेक्षण 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले. सर्व राज्यातील एकूण 25,951 मतदारांशी बोलल्यानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. इंडिया टुडेच्या ओपिनियन पोलनुसार, एनडीए आणि इंडिया अलायन्समधील मतांच्या शेअरमध्ये फक्त दोन टक्के फरक असल्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात एनडीएला ४३ टक्के तर इंडिया अलायन्सला ४१ टक्के मतं मिळाली आहेत.
इंडिया आघाडीच्या जागांमध्ये वाढ
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, एनडीए आघाडीला 51 जागांचे नुकसान होऊन एकूण 306 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडीच्या जागांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. या सर्वेक्षणात विरोधी पक्षांच्या महाआघाडीला एकूण 193 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 44 जागा मिळू शकतात.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 357 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला केवळ 91 जागा मिळाल्या. या दृष्टिकोनातून एनडीएला एकूण 51 जागा कमी पडू शकतात, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा दुप्पट होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीला 153 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
आज लोकसभा निवडणूक, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भाजपच्या एनडीए आघाडीला यावेळीही पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजप एकहाती बहुमताचा आकडा 272 पार करू शकतो. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला 16 जागा कमी मिळाल्या. जाणून घ्या कोणाकडे किती जागा आहेत?
एनडीए – 306 जागा
इंडिया – 193 जागा
भाजप – 287 जागा
काँग्रेस – 74 जागा
इतर – 184 जागा