Tuesday, November 5, 2024
Homeगुन्हेगारीनरखेड तालुक्यातील आणखीन एका शेतकऱ्याची आत्महत्या...

नरखेड तालुक्यातील आणखीन एका शेतकऱ्याची आत्महत्या…

  • नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच.
  • शासनाचे शेतकरी आत्महत्याकडे दुर्लक्ष.
  • रमेश गोविंद काळे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव.
  • शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या.
  • प्रजासत्ताक दिनाला झालं मृत्यू.

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना. गेल्या एक वर्षापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असून सुद्धा शासन गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे. एका वर्षात तालुक्यातील जवळपास 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जात मोठ्या प्रमाणत युवक शेतकऱ्यांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यातील महेंद्री येथील शेतकरी रमेश गोविंद काळे वय वर्ष 50 रा. महेंद्री या शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

या शेतकऱ्याने 17 जानेवारीला शेतात विष प्राशन केले असता बाजूच्या शेतातील मजुरांना रमेश काळे शेतात पडून दिसले असता त्यांना जलाल खेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले.

त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सतत च्या नापिकीमुळे व स्टेट बँकेचे असलेले 1 लक्ष 50 हजार रुपये तसेच खासगी बँकेचे असलेल्या कर्जामुळे खासगी बँक कर्मचारी पैशासाठी घरी तकादा लावत होते. तसेच त्यांचेवर बचत गटाचे सुध्दा कर्ज होते.

ते नेहमी विचारात राहत होते त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे व सततच्या नापिकीमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे घरच्यांनी सांगितले. रमेश काळे यांच्याकडे 65 आर शेती असून त्यांना दोन मुले व पत्नी असा परिवार असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: