Sunday, December 22, 2024
Homeराज्यनरखेड तालुक्यात आणखीन एका शेतकऱ्याची आत्महत्या...

नरखेड तालुक्यात आणखीन एका शेतकऱ्याची आत्महत्या…

  • पिंपळदरा येथील राजीव बाबुराव जूडपे या शेतकऱ्याने केली आत्महत्या.
  • सोमवारी दुपारी घडली घटना.
  • पत्नी च्या नावे होती तीन एकर शेती.
  • शेतातील झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या.
  • ठेक्याने केली होती शेती.
  • सततच्या नापिकीमुळे व बँकेच्या कर्जामुळे होते चिंतेत.

नरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबण्यास नाव घेत नसून तालुक्यातील पिंपळदरा येथील शेतकरी राजीव बाबुराव जूडपे वय वर्ष 58 याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. राजीव जुडपे यांच्याकडे पत्नी च्या नावे तीन एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी इतरही शेती ठेक्याणे केली होती.

यावर्षी सतत सुर असलेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिके पूर्ण पणे खराब झाली असून शेतकऱ्यांचे पूर्ण पने नुकसान झाले असून अजून पर्यंत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत केलेली नाही. त्याच प्रमाणे जुडपे यांच्यवर थडीपवनी येथील स्टेट बँक चे कर्ज होते.

सततच्या पावसामुळे झालेल्या नापिकीमुळे व बँकेच्या कर्जामुळे ते सतत चिंतेत होते. सोमवारी राजीव जुडपे बैल शेताकडे चारायला गेले असता दुपारी त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील काही नागरिक 2.30 सुमारास गुरे चारायला गेले असताना त्यांना हे दिसून आले.

तालुक्यातील एकाच आठवड्यातील तिसरी आत्महत्या असून तालुक्यातील शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. या घटनेची माहिती जलाल खेडा पोलिसांना दिली असून ठाणेदार मनोज चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बीट जमादार पुरुषोत्तम धोंडे करीत आहे.

गावातील काही गुरेबकऱ्या चारणारे नागरिक या परिसरात गेले असता त्यांना राजीव जुडपे हे झाडाला लटकलेले दिसले असता त्यांनी आरडाओरड केली व गावात माहिती दिली आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले असता शेतकरी राजीव जुडपे यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती दुपारी 3 वाजता जलालखेडा पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी पोहचली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आला. मृतकाच्या पत्नीच्या व मुलाच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर सावकारी कर्ज सुद्धा असल्याचे सांगण्यात येत आहे

पिपळदरा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे सततच्या नापिकीमुळे तालुक्यात अशा घटना घडत आहे सरकार अजून किती शेतकऱ्यांचे बळी घेणार आहे शासनाने तात्काळ मदत करावी माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहचून मृतकाच्या कुटुंबियाची भेट घेतली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: