बुलढाणा ची घटना ताजी असताना आणखी मोठा अपघात समृद्धी महामार्गावर घडला आहे. ठाण्याच्या शहापूरजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर मशीन पडले आहे. या अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ६ जण खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या बांधकामादरम्यान हा अपघात झाला.
पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर मशीनचा वापर सुरू असताना अचानक 100 फूट उंचीवरून मशिन खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. खाली काम करणारे मजूर त्याच्या कचाट्यात आले. त्यापैकी 16 जणांचा जागीच मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अजून लोक अडकले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बचावकार्य सुरूच आहे
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ढिगारा हटवून उर्वरित लोकांना बाहेर काढण्यासाठी टीम सतत प्रयत्न करत आहे. एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. समृद्धी महामार्गावर लाँचर पडल्याने मजूर आणि इतर लोकांना फटका बसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तीन जखमींना शहापूर तालुक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे
एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात पुलाच्या स्लॅबवर क्रेन पडली. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात तीन जण जखमी झाले आहेत. अजूनही सहा जण गर्डरखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.