मूर्तीजापुर येथील आय एस.ओ.मानांकन प्राप्त स्व.रामदास भैय्या दुबे सेमी इंग्लिश काॅन्व्हेंट नगर परिषद शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात व विविध स्पर्धांचे आयोजन करूण संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती,संत गाडगेबाबा बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
आयोजीत वार्षीक स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणुन नगर परिषदेच्या प्रशाशक तथा मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया टवलारे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे,प्राचार्या संध्याताई दुबे माजी नगरसेवक इब्राहीम कासम घानीवाला,भारत जेठवाणी,महादेवराव तिरकर, कैलाश महाजन समाजसेवक,राहुल गुल्हाने,संदीप जळमकर,न.प.प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने,माजी मुख्याध्यापिका मालीनी विजयकर,
रेखाताई सावळे, समाजसेवक कमलाकर गावंडे,शाळा व्यस्थापन समीती अध्यक्षा प्रज्ञा पंडीतकर,आशीष बरे,अनिसाबी,लता किडे आदींची उपस्थिती होती.नगर परीषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या आय.एस.ओ.मानांकन प्राप्त स्व.रामदास भैय्या दुबे सेमी इंग्रजी शाळेच्या आयोजित तिन दिवशीय वार्षीक स्नेहसंमेलनात क्रिडा, रांगोळी,चित्रकला, नृत्य,कला,आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.शिक्षण प्रशासन अधिकारी यांनी करून शाळेच्या प्रगती विषयी माहिती विषद केली.यावेळी नगर परीषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया टवलारे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेनी केलेली लाक्षणीय प्रगती विषयी माहिती विषद केली.
संचालन सहाय्यक शिक्षक विशाल अंबळकर यांनी तर आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक शिक्षीका शुभांगी येऊल,विशाल अंबळकर,पुजा महाजन,दिपक हांडे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाला बहुसंख्येने विधार्थी,पालक, नागरिक यांची उपस्थिती होती.