रामटेक – राजू कापसे
पटवारी संघटनेच्या वार्षीक आमसभेचा दोन दिवसीय कार्यक्रम नुकताच दि. २७ व २८ मे दरम्यान मोठ्या थाटात पार पडला. यावेळी विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. दरम्यान विविध राजकियांनी सुद्धा सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आवर्जुन हजेरी लावली होती.
शहरातील टक्कामोरे सभागृहात सदर आमसभेचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पैकी पहित्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ मे रोज शनिवारला सायं. ६ वाजता वार्षिक आमसभा कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यानंतर याच दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २८ मे ला सकाळी १०.३० दरम्यान वार्षीक आमसभेला सरुवात झाली. यात विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांमध्ये प्रामुख्याने एस.डी.ओ. वंदना सवरंगपते , तहसिलदार हंसा मोहने, श्री. प्रशांत सांगोडे (तहसीलदार पारशीवनी), श्री. बाळकृष्णजी गाढवे (अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ), श्री. श्याम जोशी (सल्लागार, म.रा. समन्व्यक महासंघ), श्री. संजय आनव्हाने (सरचिटणीस, विदर्भ पटवारी संघ नागपुर),
श्री. प्रकाशजी सुर्वे (उपाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपुर), श्री. विजय बोराखडे (कोशाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपुर), श्री. विजय टेकाडे (अध्यक्ष, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर), श्री. एच.पी. मलिये (सरचिटणीस, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर), श्री. राजेश चुटे (अध्यक्ष, वी.प. संघ शाखा नागपुर),
श्री. गजानन भागवत (सहसचिव, विदर्भ पटवारी संघ नागपुर), श्री. विजय मर्जीवे (सचिव, वी.प.संघ शाखा नागपुर), श्री. मो.जहीर शेख (कोशाध्यक्ष, वी.प.संघ शाखा नागपुर), श्री. संकेत पालंदूरकर, श्री. संदीप आवळेकर, श्री. मुनेश बांगर, श्री. प्रतिक काष्ठे यांचेसह पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.