मौदा (ताप्र) : स्थानिक कृउबास च्या आवारात नुकतीच माजी मंत्री सुनिल केदार व खासदार श्यामकुमार बर्वे यांचे हस्ते धर्मकाटा उद्घाटन करून कृउबास ची वार्षिक सर्वसाधारण सभा धनजोडे सभागृहात पार पडली.
कार्यक्रम माजी मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार, जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, माजी राज्य मंत्री राजेंद्र मुळक, जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) देवेंद्र गोडबोले, जि.प. सदस्य तापेश्वर वैद्य, पं.स. सभापती स्वप्नील श्रावणकर, प्रसन्ना तिडके, लक्ष्मण उमाळे, तुळशीराम काळमेघ, हुकुमचंद आमदरे, सुनिल रावत, सुरेश भोयर योगेश देशमुख, शालिनी देशमुख मौदा येथील समितीचे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, अडते, व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी वर्गाचे उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन समितीचे संचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी केले, प्रास्तावीक समितीचे संचालक राजेंद्र लांडे यांनी केले, अहवालाचे वाचन समितीचे सभापती राजेश ठवकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समितीचे उपसभापती रामनरेश सेनवार यांनी केले. समितीचे प्रशासकीय सचिव प्रदिप पुरी यांनी कृषि मेळाव्याचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी समितीचे संचालक राजेंद्र लांडे, दादाराव सारवे, चंद्रभान किरपान, दिगांबर बांगडकर, नंदलाल पाटील, अनिल कोंगे, कल्पना चरडे, मंदा तुमसरे, सुनिल दारोडे, प्रमोद बरबटे, मंगेश तलमले, रोशन मेश्राम, पृथ्वीराज गुजर, सावनकुमार येळणे, मोरेश्वर सोरते. व कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.