तिरोडा गोरेगांव विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी कांग्रेसचा उमेदवार रविकान्त (गुड्डू) बोपचेच असणार – अनिल देशमुख…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
( गोंदिया ) ग्रीनलँड लॉन गोंदिया येथे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची संघटात्मक बैठक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निर्णय लवकरच होईल.
पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संपूर्ण ताकीदीने विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीत लढवेल. यासह गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघावर पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा कायम राहिल व तिरोडा गोरेगांव विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी कांग्रेसचा उमेदवार रविकान्त (गुड्डू) बोपचेच असणार हे मात्र निश्चित तसेच लोकसभा मतदारसंघाबाबत सुध्दा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन केले.
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकारचे सर्व लक्ष याच गोष्टींकडे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार व जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारप्रती प्रचंड आकस असून हा आकस २०२४ निवडणुकीत दिसेल.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र या सरकारने हेक्टरी बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. धानाला बोनस जाहीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा न करता त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
तसेच भाजपने आपल्यावर केलेले आरोप हे तथ्यहिन असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.
दवाबामुळेच ते नेते महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमध्ये सहभागी झाला.
त्यांच्यावर ईडी व सीबीआय कारवाई करण्याची होण्याची शक्यता असल्याने व दबावामुळे तेच महायुतीत सहभागी झाले. याची स्पष्टोक्ती ते आम्ही यंत्रणेच्या दबावामुळे गेलो नसल्याचे सांगून देत असल्याचा टोलाही देशमुख यांनी लगावला.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सह माजी खासदार खुशाल बोपचे यांनी गोंदिया जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकट करणे, पक्षाची नव्याने बांधणी सह विविध विषयांवर मार्गदर्शन मार्गदर्शन केले.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र सिंह बैस, मिथून मेश्राम देवेंद्र हरिणखेडे, रफीक पठाण, जित्तू कनोजे,आदिंसह पक्ष पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.