सांगली – ज्योती मोरे
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राहावा, या अनुषंगाने विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये जांभळीकर, युवराज गायकवाड ,श्री. शेवंता वाघमारे,उमर गवंडी, विनायक सिंहासने, शाहीर अशोक पवार,विष्णू माने,मुस्तफा मुजावर, श्री.अप्सरा वायदंडे, डॉ,संजय पाटील,डॉ. ध्यानचंद्र पाटील, लक्ष्मण नवलाई, प्रकाश मोरे, सुभाष चिकोडीकर यांनी आपापल्या अडचणी सांगून मनोगत मांडली.
मा. श्री. अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी व श्री संजय मोरे पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी व्यापारी व उद्योजक यांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना काय करायच्या,याबाबत मार्गदर्शन केले.तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणारे पोस्ट, संदेश यावरही पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे.
अशा काही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तसेच पोस्ट ठेवल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही अशा घटना करणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नये, पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पेट्रोलिंग, पोलीस बंदोबस्त नेमण्यात आले आहे.
सदर मिटिंग मा. पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे आयोजित केली होती.
सदर मिटींगला शांतता कमिटी, महिला दक्षता कमिटी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक,राजकीय पदाधिकारी ,मज्जिद मधील मौलाना व ट्रस्टी,
मार्केट यार्ड येथील व्यापारी उद्योजक,सराफी व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, दलित संघटनेचे प्रमुख असे शंभर ते दीडशे पदाधिकारी उपस्थित होते.सदर मिटींगला उपस्थित राहिल्यायाबद्दल मा. उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सांगली व इतर सर्वांचे पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी आभार मानले.