Monday, December 23, 2024
Homeराजकीयअण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे स्वागत…

अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे स्वागत…

खामगाव – हेमंत जाधव

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक मा.श्री. विष्णूभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे खामगाव नगरीत आगमन होताच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने स्वागत करण्यात आले आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे कोअर कमिटी अध्यक्ष कैलासभाऊ खंडारे धाराशिवचे मातंग समाजाचे युवा नेते बालाजीभाऊ गायकवड यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

सदर आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीची सुरुवात नाशिक येथुन 10 मार्च रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुषपहार अर्पण करुन सुरु करण्यात आली व येत्या 24 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे या आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे समारोप महाआंदोलन करुन करण्यात येईल अशी माहिती आरक्षण वर्गीकरण मोटरसायकल रॅलीचे नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णुभाऊ कसबे यांनी दिली व येत्या 24 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने मातंग समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आव्हान केले.

याप्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे, शा.ना. मानकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ नाटेकर जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने, जिल्हा संघटक शंकर वाघ, शेगांव तालुका अध्यक्ष श्रीराम गायकवाड सागर गायकवाड मार्गदर्शक सुनिलभाऊ नाटेकर शहर संघटक योगेश नाटेकर, करण सकळकले, गौरव गायकवाड उज्वल काळभागे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: