दानापूर – गोपाल विरघट
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास 21 कादंबऱ्या लिहिल्या मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गिते इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अण्णाभाऊच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन परीस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.
अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ग्रामपंचायत भवन दानापूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सपना वाकोडे यांच्या हस्ते प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले, यावेळी ग्रामविकास अधिकारी के.एस. इंगळे, मा. उपसरपंच साहेबराव वाकोडे, मा. सरपंच महादेव वानखडे,
तंटामुक्ती अध्यक्ष तेजराव वाकोडे,पत्रकार गोपाल विरघट,धम्मपाल वाकोडे, नरहरी हागे,भीमराव पहूरकार ग्रा. पं. कर्मचारी अशोक राहणे, पांडुरंग मानकर, बाळू श्रीनाथ, अविनाश जामोदकार, रामकृष्ण हागे, अमोल नराजे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक राहणे तर आभार महादेव वानखडे यांनी मानले.