Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअण्णा हजारे संतापले...आव्हाडांना दिली धमकी...काय म्हणाले?...

अण्णा हजारे संतापले…आव्हाडांना दिली धमकी…काय म्हणाले?…

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. खरे तर नुकतेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आव्हाड म्हणाले होते की, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मोठा इशारा दिलाय. आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे अण्णा हजारे संतापले.

अण्णा हजारे यांनी वृत्तवाहिन्यांला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

अण्णा हजारे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली. “आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ. हे ज्याने म्हटलं, वाटोळं केलं, त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा लावता येईल का, कुठे-कुठे लावता येईल, कसा लवता येईल याची चौकशी करुन, योग्य तो निर्णय घेऊ”, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: