देवलापार – राजू कापसे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुमारी येथील उपक्रमशील शिक्षिका अंजली विकास गणवीर यांनी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत इयत्ता 6 ते 8 गटात विज्ञान विषात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषण पुणे यांनी शिक्षकांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्ये निर्माण करण्यासाठी तसेच अध्यापनात आधुनिक तंत्रांचा वापर करण्याच्या उद्देशाने मागील वर्षी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन केलेले होते. त्यात इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत विविध विषयानुसार विविध गट तयार करण्यात आले होते.