Sunday, November 3, 2024
Homeराज्यदत्तगुरु गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध चेंडाळणे तर सचिवपदी शशांक वक्ते...

दत्तगुरु गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध चेंडाळणे तर सचिवपदी शशांक वक्ते…

खामगाव – हेमंत जाधव

दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तगुरु गणेश उत्सव मंडळाचा वतीने घाटपुरी नाका येथे गणेश उत्सव आयोजित करण्यात आला आहे, या उत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध चेंडाळणे तर सचिवपदी शशांक वक्ते यांची निवड करण्यात आली आहे.

रजत नगरीत तसेचं खामगांव मध्ये नामांकित मंडळ म्हणून ओळखले जाणारे आणि उत्सवा पैकी मानल्या जाणाऱ्या दत्तगुरु मंडळाचा गणेश उत्सव सोहळा शुक्रवार 19 सप्टेंबर गणेश चतुर्थी रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या नियोजनाची बैठक मंगळवारी पार पडली.

दत्तगुरु मंडळाचे अध्यक्ष ओमभाऊ शर्मा, विनोदसेठ डिडवानिया, धरमचंद सुराणा, भास्करकाका चंडाळणे, सुनील मानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत सर्वानुमते उत्सव समिती गठीत करण्यात आली. सर्वानुमते या गणेश उत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध चेंडाळणे यांची निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी निलेश हांडके, अजय किरकाळे, सचिवपदी शशांक वक्ते, सहसचिवपदी यश (गोलू) आमले कोषाध्यक्षपदी संदीप भरडक, सहकोषाध्यक्षपदी मोहित आयलानी कायदेविषयक सल्लागार म्हणून अँड. रितेश निगम तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून पांडुरंग काळे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला राजूभाऊ मोरे, धरामसिंग बयस, सुरेंद्र पवार, सुरेश अवचार, किरण बोंबटकार, नाना चिकटे, संदीप भगत, अनमोल शर्मा, रवी डोंगे, राजेश जवळेकर, निलेश महल्ले, राम पवार, सचिन असनमोल, चेतन घोडाळे, विजय किरकाळे, निखिल देशमुख, आकाश सातव, धनंजय देशमुख, अक्षय सातव, धीरज कुयते, यश शर्मा, ज्ञानेश्वर ढगे, वैभव डबेकर, अजय महाजन, शुभम जिरंगे, वैभव विंचनकर,

विक्की सोळंके, मनोज पालीवाल, अमित तळपते, सागर चोपडे, नितीन साबळे, पवन देशमुख, पवन ठाकरे, स्वप्निल कुलकर्णी, दिनेश वैध्य, लाला यादव, अजय गावंडे, अक्षय सातव आदि दत्तगुरु मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: