Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनअनिल कपूरने या वयात मायनस डिग्रीमध्ये केला शर्टलेस वर्कआउट...

अनिल कपूरने या वयात मायनस डिग्रीमध्ये केला शर्टलेस वर्कआउट…

न्युज डेस्क – एकीकडे वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र आपल्या वर्कआऊटने सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर दुसरीकडे अनिल कपूरचा फिटनेस सर्वांना चकित करणारा आहे. अनिल कपूर लवकरच ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यासाठी ते जोरदार तयारी करत आहे. अलीकडेच, अनिल कपूरने मास्क घालून ट्रेडमिलवर धावतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि आता तर -110 डिग्री तापमानात कार्डिओ करताना दिसत होते. अनिल कपूरने हा वर्कआउट शर्टलेस केला, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

कडाक्याच्या थंडीत कपड्यांशिवाय जगणेही कठीण झाले असताना अनिल कपूर एका चेंबरमध्ये फक्त हाफ पँट घालून वर्कआउट करताना दिसत आहेत. या चेंबरमध्ये उणे ११० अंश तापमान होते. अनिल कपूरने त्याच्या वर्कआउटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘नॉटी @ 40 का टाइम गया, अब सेक्सी @ 60 का टाइम है.’ टिस्का चोप्रा ते जॅकी श्रॉफ, नीतू कपूर, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अनिल कपूरच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

ही चरबी कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त होण्यासाठी अनिल कपूर कॅरोथेरपी घेत असल्याची माहिती आहे, ज्याला कोल्ड थेरपी देखील म्हणतात. परंतु ही थेरपी केवळ व्यावसायिक तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली केली जाते.

अनिल कपूरचा हा वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहत्यांना आश्चर्य झाले आहेत. सेलेब्सही हैराण झाले आहेत. अगदी अनिल कपूरची पत्नी सुनीता ते मुलगी रिया कपूर यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनिल कपूरला कोल्ड थेरपी वर्कआऊट करताना पाहून कपिल शर्माही स्वत:ला थांबवू शकला नाही आणि ‘वाह, व्वा, मलाही करावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अनिल कपूरने कपिलला सोबत येण्यास सांगितले आणि ‘जुलैमध्ये माझ्यासोबत चल’ असे लिहिले.

‘फाइटर’चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याची माहिती आहे, ज्याने शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. हा एक एक्शन चित्रपट असेल, ज्यामध्ये अनिल कपूर व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, करण सिंग ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय देखील दिसणार आहेत. ‘फाइटर’ 2024 मध्ये रिलीज होणार आहे. अनिल कपूर अलीकडेच ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याच्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: