Andhra Pradesh Train Accident : देशातील रेल्वे अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता मोठा चिंतेचे विषय बनले आहे. आता आणखी आंध्रप्रदेश येथून विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनची मागून टक्कर झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात तीन डबे प्रभावित झाले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला मदत आणि रुग्णवाहिकेसाठी कळवण्यात आले आहे. अपघात निवारण गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही बोलून लोकांना सुविधा आणि उपचार देण्यास सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी ट्रेन विशाखापट्टणम जिल्ह्यात रुळावरून घसरली. यानंतर दोन गाड्यांमध्ये धडक झाली. दुसरी पॅसेंजर ट्रेनही असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी होण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 10 जण जखमी झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्राथमिक तपासात हे सिग्नल ओव्हरशूटिंगचे प्रकरण असल्याचे दिसते.
या घटनेबाबत, पीएमओने ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून अलमांडा आणि कांतकापल्ले सेक्शन दरम्यान दुर्दैवी ट्रेन रुळावरून घसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकारी नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहेत. पंतप्रधानांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.” पीएम म्हणाले, “जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.”
#WATCH | Andhra Pradesh train accident | Rescue operations underway
— ANI (@ANI) October 29, 2023
6 people died and 18 injured in the Andhra Pradesh train accident: Deepika, SP, Vizianagaram pic.twitter.com/x2Rx13mfXf