अहेरी – मिलिंद खोंड
अहेरी येथील ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ. चा श्वान वेन्स (VENCE) याचे ०४/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०७:२० वाजता G/३७ वी वहिनी, कोठी, तहसील- भामरागड, जिल्हा- गडचिरोली (महाराष्ट्र) येथे आकस्मिक निधन झाले. वेन्स अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोठीमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आले होते.
श्वान वेन्स (VENCE) चा जन्म १४/११/२०१९ रोजी डी.बी. टी.एस. (डॉग ब्रिडींग अँड ट्रेनिंग स्कूल) तरालु येथे झाला आणि तेथे त्याचे दोन हँडलर कॉन्स्टेबल/जीडी अभिजित चौधरी आणि कॉन्स्टेबल/जीडी शुभजित गराई यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान वेन्स ने सर्वोत्कृष्ट श्वानाचा किताब पटकावला.
त्यानंतर, १३/०४/२०२१ पासून, त्यांची ३७ बटालियन मध्ये नियुक्ती करण्यात आली आणि अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये भाग घेऊन, दलाला आई. ई.डी./ अॅम्बुश इ. नुकसानीपासून वाचवले. वेन्स स्फोटक शोधून, आई.पी. (इन्फन्ट्री पेट्रोल) आणि हल्ला करण्यात माहिर होता. वेन्सच्या जाण्याने दलाला मोठा फटका बसला आहे.
अशा शूर श्र्वाना चा सन्मान करण्यासाठी, एम.एच. खोब्रागडे, कमांडंट, ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ., श्री आर.एस. बालापूरकर, कमांडंट, ०९ बटालियन आणि ३७ व ०९ बटालियन चे सर्व अधिकारी, अधिनस्थ अधिकारी आणि सर्व जवानांच्या व्दारे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आणि ओल्या डोळ्यांनी वेन्स ला अखेरचा निरोप देण्यात आला…