रामटेक – राजु कापसे
अख्ख्या नागपुर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी, शिकार तथा जंगल सफारीसाठी नेहमीच चर्चेत असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आज १३ नोव्हेंबर ला येथील सिल्लारी गेट जवळच पर्यटकांना बिबट्याद्वारे केलेल्या शिकारीचा प्रसंग पहावयास मिळाला.
बहुतांश पर्यटकांना जंगल सफारी करणे फार आवडत असते. सफारीदरम्यान ‘ वाघ दिसेल काय, शिकारीचे थरारक दृष्य पहायला मिळेल काय ‘ याबाबद पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता असते. मात्र काहींना १० जंगल सफारी केल्यावरही हे सर्व दृष्टीपथास पडत नाही तर काहींना एकाच जंगल सफारीत दिसुन येत असते.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी गेट हे वनक्षेत्र पर्यटकांचे जंगल सफारीसाठी आवडते वनक्षेत्र आहे. आज दि. १३ नोव्हेंबर ला सायंकाळच्या सुमारास येथील सिल्लारी गेट जवळ बिबट्याने हरीणाची शिकार केल्याचा प्रसंग प्रेक्षकांना पहावयास मिळाला. यावेळी येथे पर्यटकांच्या ४ गाड्या उभ्या होत्या. दरम्यान वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी हे छायाचित्र टिपले.