Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingआणि अचानक नाना पाटेकर चिडले…तरुणाच्या लगावली कानशिलात…व्हिडिओ व्हायरल…

आणि अचानक नाना पाटेकर चिडले…तरुणाच्या लगावली कानशिलात…व्हिडिओ व्हायरल…

न्यूज डेस्क : नाना पाटेकर यांनी वाराणसीमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या प्रवासाच्या शूटिंगदरम्यान सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नानांना इतका राग आला की त्यांनी जमावासमोर त्यांच्या एका चाहत्याला थप्पड मारली. नानांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नाना पाटेकर यांचे हे वागणे पाहून नेटिझन्स दु:खी झाले असून त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ शूटिंग सेटचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नाना एक सीन शूट करण्यासाठी उभे राहिले आहेत. तेवढ्यात एक चाहता नानांच्या जवळ येतो आणि सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून नाना संतापतात आणि चाहत्याला चापट मारतात.

सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात चाहत्याला थप्पड मारली
कोणत्याही ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असले की, आसपासच्या लोकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरतो. अभिनेता पाहण्याची आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा प्रत्येक दर्शकाच्या मनात कायम असते. सध्या नाना पाटेकर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर चित्रपटाचा शॉट तयार असताना त्याच्या सीनसाठी उभे असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक तरुण त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतो. हे पाहून नाना पाटेकर यांचा संयम सुटला आणि सर्वांसमोर चाहत्याला मारले. चाहत्याला पाहून युनिटचे इतर सदस्य आले आणि त्याला पकडून बाहेर घेऊन गेले.

‘जर्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर २’ फेम अनिल शर्मा करत आहेत. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत असून पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित ही कथा आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एका यूजरने म्हटले की, ‘सर, सर्वसामान्यांनाही आदर द्या.’

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: