मुंबई :- महाराष्ट्राचा राजकारणात पुन्हा एक वेळा भूकंप झाल्याचे पहावयास मिळत आहे. 2019 मध्ये पहाटेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महाराष्ट्र हादरविला होता, त्याच धर्तीवर सण 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार पाडून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत संगत साधून महायुती सरकार स्थापन केली.
तर महायुती सरकारला अवघा एक वर्ष होत नाही तर पुन्हा आज 1 जुलै रोजी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पहावयास मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांच्यासह 40 आमदार युती करत पुन्हा सरकार स्थापन करण्याचे आयोजील्याचे चित्र समोर आले आहे. या घटनेमुळे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे दिसून येत आहे.