Thursday, December 26, 2024
Homeराज्यआणि पाच लेकरांवरून हरवले बापाचे छत्र...

आणि पाच लेकरांवरून हरवले बापाचे छत्र…

मृतक लखन च्या भावाने सांगीतली लखनच्या परिवाराची व्यथा…

परिवाराला हाथआसरा म्हणून आर्थिक भरपाईची , आर्थिक मदतीची परिवाराची मागणी…

रामटेक – राजु कापसे

रामटेक शहरापासुन मानापुर कडे गेलेल्या मार्गावर असलेल्या राखी तलाव चौक येथे गोंदिया कडून मनसर कडे भरधाव वेगाने जात असलेल्या कार ने विरुद्ध दिशेला झाडाखाली उभा असलेल्या पाणीपुरी हातठेल्याला जोरदार धडक दिली.

यात पाणीपुरी खाण्यासाठी उभा असलेल्या लखन शेखर भोसले वय 35 वर्ष राहणार अमानजपूर जिल्हा अकोला याचा जागेवरच मृत्यु झाला. लखनच्या मृत्युने त्याच्या पत्नीसह अवघा दिड वर्षाचा मुलगा तथा चार मुलींच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे लखन चा सख्खा भाऊ रामा शेखर भोसले वय ३२ याने माहिती देतांना सांगितले.

मृतक लखन हा दुचाकी ने गावोगावी फिरून फायबर करोक्री भांड्यांची विक्री करून त्यातुन मिळणाऱ्या पैशातुन आपला संसारगाडा चालवायचा. पत्नी प्रेमता वय ३२ , ४ मुली नाव तुषारिका , गुगरा , एकता , उर्मीला तथा एक अवघा दिड वर्षाचा मुलगा गगन असा लखन चा परिवार. लखन हाच परिवारातील कर्ता कमावता होता.

धंद्यासाठी दुचाकी आवश्यक असल्याने लखन ने नुकतेच तिस हजार रुपयांचे कर्ज घेऊ किस्तीवर दुचाकी उचलली होती. त्याच दुचाकीवर गावोगावी फिरून तो फायबर करोक्री भांड्याची विक्री करीत होता. मृतक लखन चा भाऊ रामा याने याने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक लखन हा राखी तलाव येथे आपल्या मुलाबाळांना घेऊन आंघोळ तथा कपडे धुण्यासाठी आलेला होता.

दरम्यान निरमा पावडर पॅकेट आणण्यासाठी बायपास रस्ता पार करून तो एका दुकानात आला होता. तेव्हा राखी तलाव चौकात रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणिपुरी ठेल्यावर गुपचुप खाण्यासाठी उभा असतांना गोंदीया कडून येणाऱ्या भरधाव कार ने त्याला उडविले. धडक एवढी जोरदार होती की लखनचा जागेवरच मृत्यु झाला.

त्याच्या मृत्युने त्याचा परिवार उघड्यावर आलेला आहे. परिवारापुढे मुख्यत्वे मोठा व बिकट आर्थिक प्रश्न आ वासुन उभा ठाकला आहे. तेव्हा त्याचा भाऊ रामा तथा कुटुंबातील सदस्यांनी आरोपीवर कारवाईची तथा लखन च्या परिवारासाठी आर्थिक भरपाई , आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: