अन्नदात्यांनी सहकार्य करावे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे आवाहन
महेंद्र गायकवाड
नांदेड
मुंबईनंतर नांदेड येथे पहिल्यांदाच धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेला “भाऊचा माणुसकीचा फ्रिज” हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामध्ये जास्तीत जास्त नांदेडकरांनी खाद्यपदार्थ ठेवून फ्रिज नेहमी भरलेला राहण्यासाठी अन्नदात्यांनी सहकार्य करावे असे आवाहन उद्घाटक पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.
पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक नांदेड येथे अमरनाथ यात्री संघातर्फे झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण साले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचवटी हनुमान मंदिर चे विश्वस्त अनिलसिंह हजारी, अरविंद भारतीया, अशोक धनेगावकर, व्यंकट मोकले, ॲड. दागडीया, बागड्या यादव, सनतकुमार महाजन, बालाजी सूर्यवंशी हे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून फ्रिजचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, या उपक्रमासाठी ३६५ अन्नदात्यांची आवश्यकता असून आपल्या प्रियजनांच्या वाढदिवस अथवा स्मृतिदिनानिमित्त दानशूर व्यक्तींनी अन्नदान करावे. सर्व अन्नदात्यांची नावे नामफलकावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. प्रमोद शेवाळे यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमाचे लवकरच शतक पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला.भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना असे आवाहन केले की, या फ्रिजमध्ये खाद्य पदार्थ ठेवताना शिळे व खराब झालेले असू नये याची दक्षता घेण्यात यावी. अनिलसिंह हजारी यांनी दिलीप ठाकूर यांच्या कल्पकतेचे भाषणातून कौतुक केले.
यावेळी फ्रीज उभारणीसाठी मदत करणारे सुरेश लोट, राजेंद्र नारायणसा दमाम,,सौ. वनिता डॉ. शिवाजी शिंदे इस्लामपूर,संजय शंकरराव उत्तरवार,सुदाम नगारे,एल.के. कुलकर्णी,सतीश सुगनचंदजी शर्मा,विश्वजीत मारोती कदम धानोरा,मोहीत जयप्रकाश सोनी,उपेंद्र मुळावेकर,सिद्राम दाडगे,अर्जुन कृष्णासा दमाम,वंसा किशनराव देशमुख,व्यंकटेश कवटेकवार,नरेश सोमाणी,शशिकांत देशपांडे बाऱ्हाळी,वंदना प्रभाकर कुलकर्णी यांचा शाल, मोत्याची माळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक देशपांडे व जगदीश भंडरवार, कैलाश महाराज वैष्णव, सुरेश निल्लावार, शततारका पांढरे,प्रगती निलपत्रेवार, राज यादव, तिरुपती भगनुरे, बिरबल यादव, अनिल कटकमवार,सुधीर प्रधान,डॉ. संजय महाजन, लायन्स अध्यक्ष शिवा शिंदे, प्रवीण जोशी, शिवाजी पाटील, दिलीप कलवानी, राजेश यादव,गोपाळराव माळगे, रूपेंद्रसिंघ साहू, राजेश यादव, सतीश बेरुळकर, विजय अग्रवाल, आनंदराव सूर्यवंशी,माधव चांदणे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामाजी सरोदे यांनी तर आभार सुरेश लोट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, सुरेश शर्मा ,नरेश आलमचंदानी, विजय वाडेकर, सुधीर देबडवार, संजीवसिंघ निल,राम जंगमे,तात्येराव पाईकराव,सुरेश धोंगडे यांनी परिश्रम घेतले. दिवसभर ढगाळ वातावरण असताना कार्यक्रम संपल्याबरोबर मुसळधार पाऊस पडल्यामुळे या अनोख्या उपक्रमाला निसर्गाने सुद्धा साथ दिली अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. गरजू लोकांसाठी एक आगळावेगळा सत्याहत्तरवा उपक्रम सुरू केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.