Sunday, December 22, 2024
Homeराज्यआणि दानविर वैकुंठात विलीन झाला...कव्हळा व पंचक्रोशीत शोककळा...

आणि दानविर वैकुंठात विलीन झाला…कव्हळा व पंचक्रोशीत शोककळा…

कव्हळा – ह.भ.प सीताराम संपत जाधव कव्हळा ही कर्मभूमी पण संपूर्ण चिखली तालुका मध्ये जे आपल्या उदारता, दानशूरता व विठ्ठलभक्ती साठी प्रचिलीत होते.काल दिनांक २१/०७/२०२३ रोजी रात्री ११:३० चा सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

मंदिरांची जिर्णोउदार, भुकेल्याना अन्न, तहणलेल्यानं पाणी, आजाऱ्याला औषध,एवढंच नव्हे पंढरीची यात्रा करू भागणाऱ्या वारकरी, गोरगरिबांना प्रवासाला लागणार खर्च अश्या अनेक दृश्य अदृश्य गुपित दान त्यांनी त्यांचा जीवन प्रवासात केले त्यामुळे प्रत्येक गोरगरीबाला, गरजुला सीताराम बाबांच्या घराचे दरवाजे कायम उघडे असतात असे लोक बोलायचे.

विठ्ठल भक्तीची एवढी ओढ की प्राणत्यागणाच्या २ दिवासनागोदारच पंढरपूरच्या मायबाप विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले. त्यांचा जान्याने संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे त्यांचा पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, सुना, नातू, नाती असा बराच अपत्य परिवार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: