Monday, December 23, 2024
Homeराज्यभाजप ने पत्रकारांची प्रतिमा “धाब्या” वर बसविली... अनंत गाडगीळ

भाजप ने पत्रकारांची प्रतिमा “धाब्या” वर बसविली… अनंत गाडगीळ

मुंबई – केन्द्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत.

१) भाजपला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टिव्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजिनामा घेण्यात आले.

२) संसद भवनात पत्रकार गॅलरी शिवाय ईतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ३) संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्त्रकारांना निवृती नंतर पूर्वी विशेष पास दिला जायचा तोही बंद केला.

४) निर्भिडपणा दाखविणार्या चॅनेलची मालकीच बदलण्यात आली.

५)आता तर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार “ धाब्यावर बसवली आहे.

हेच कॅांग्रेसच्या राजवटीत झाले असते तर अग्रलेख व रकाने यांनी पेपर भरून गेले असते. एवढे सारे होऊनही पत्रकार गप्प का? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला असे प्रश्न आज काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात/आमच्या प्रतिनीधीशी बोलताना उपस्थित केले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: