Monday, December 23, 2024
Homeराज्यआनंद वार्ता अकोला अकोट प्रवासी रेल्वे फेऱ्यास केंद्राची हिरवी झेंडी... ह्या फेऱ्या...

आनंद वार्ता अकोला अकोट प्रवासी रेल्वे फेऱ्यास केंद्राची हिरवी झेंडी… ह्या फेऱ्या शीघ्रतीशीघ्र सुरू करण्याची सूचना…

आकोट – संजय आठवले

अकोला आकोट सडक मार्गावरील गांधीग्राम नजिक पूर्णा नदिवरिल पूल नादुरुस्त झाला. त्यामूळे अकोला आकोट प्रवासी रेल्वे सुरू करण्याचा सर्व स्तरातील रेटा वाढला. राजकीय नेते, प्रतिष्ठित नागरिक, जिल्हाधिकारी अकोला यांनीही ही रेल्वे सुरू होण्याकरिता पाठपुरावा केला. अखेर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने सामूहिक जनभावना लक्षात घेता, अकोला आकोट प्रवासी रेल्वे फेऱ्या सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. रेल्वे बोर्डाचे उपनिदेशक विवेक कुमार सिंन्हा यांनी या संबंधित सर्व रेल्वे विभागांना या संदर्भात सूचित केले आहे.

त्यामुळे अकोला आकोट प्रवासी रेल्वे फेऱ्या कोणत्याही क्षणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीन्हा यांनी जारी केलेल्या या आदेशात ही रेल्वे सेवा सुरू करण्याचा निश्चित कालावधी अधोरेखित केलेला नाही. परंतु ही सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

ही रेल्वे प्रवासी असल्याने अकोला आकोट दरम्यान असलेल्या उगवा, गांधी स्मारक रोड आणि पाटसूळ येथे थांबा देण्यात आलेला आहे. ही रेल्वे दर दिवशी नियमित धावणार आहे. याकरिता केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची समय सारणी ही निश्चित करून दिली आहे. ही रेल्वे अकोला स्थानकावरून पहाटे ६.०० वा. निघून आकोट येथे सकाळी ७.२० वा. पोहोचणार आहे. तेथे ४० मिनिटे विश्राम केल्यानंतर ही रेल्वे सकाळी ८.०० वा. आकोट येथून निघून सकाळी ९.२० वा.अकोला येथे पोहोचणार आहे.

दुसरी फेरी- ही रेल्वे अकोला येथून सायंकाळी ६.०० निघून रात्री ७.२० वा. आकोट येथे येईल. तेथे ४० मिनिटे थांबा घेतल्यावर रात्री ८.०० वा. अकोल्यासाठी रवाना होईल. आणि रात्री ९.२० वा. अकोला येथे पोहोचेल. केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्या या मंजुरीमुळे आता लवकरात लवकर ही रेल्वे सेवा सुरू होण्याची सुचिन्हे दृष्टीपथात आली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: