बदलत्या काळात अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या काळात अशा अनेक घडामोडी आणि नवीन काही तरी बदल होत आहेत, जी पाहून लोक आश्चर्यचकित होतात. आजच्या काळात रस्त्यावर धावणारी बाईक उद्या हवेत उडताना दिसणार. याचे जिवंत उदाहरण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. आनंद महिंद्रा नेहमीच वेगळ काही असेल तर ते नेहमीच शेयर करतात, नुकतीच समोर आलेली त्यांची ही पोस्ट लोकांना हैराण करीत आहे.
नुकताच समोर आलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ‘स्टार वॉर्स’ या हॉलिवूड चित्रपटाचीही आठवण होईल. XTURISMO ही एक हॉवरबाईक आहे, जी हवेत उडू शकते. खरं तर, एका जपानी स्टार्ट अप कंपनी एरविन्स टेक्नॉलॉजीजने युनायटेड स्टेट्समधील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये फ्लाइंग हॉवरबाईक लॉन्च केली आहे. ही जगातील पहिली उडणारी बाईक म्हणून ओळखली जात असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्याचा वेग 62 किलोमीटर प्रति तास असेल आणि ती 40 मिनिटे हवेत उडू शकते.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अकाऊंटवरून या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. या उडत्या बाईकवर एक व्यक्ती बसून ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जपानी स्टार्टअपची फ्लाइंग बाइक. यूएस मध्ये सुमारे $800K खर्च येईल. मला शंका आहे की ते प्रामुख्याने जगभरातील पोलिस दलांकडून वापरले जाईल. बर्याच चित्रपटांमध्ये मनोरंजक चेस सीक्वेन्ससाठी देखील वापरले जाऊ शकते.
कॅप्शननुसार, याची किंमत 800 हजार डॉलर्सपेक्षा जास्त असेल, म्हणजे अमेरिकेत सुमारे 6,50,00,000 भारतीय रुपये. या बाईकचा व्हिडिओ आतापर्यंत 7.3 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी हा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वत्र पाहत आहे. ते असा दावा देखील करत आहेत की ते आधीच जपानमध्ये विक्रीसाठी आहे. कोणी मला सांगू शकेल की ते जपानमध्ये कुठे उपलब्ध आहे आणि ते कुठेही उडत असल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. आणखी एका युजरने लिहिले की, ‘भारतातील अनेक लोकांनी फ्लाइंग बाईकवरही काम केले आहे.’