Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअज्ञात वाहनाने दुचाकीला धडक...दोघे गंभीर,अज्ञात वाहन पळाल्याची माहिती...

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक…दोघे गंभीर,अज्ञात वाहन पळाल्याची माहिती…

पातूर – निशांत गवई

बाळापूर पातूर रस्त्यावरील धनेगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाल्याची घटना गुरुवार रोजी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली आहे.दुचाकीस्वार सुरेश पुंडलिक बोचरे रा. पातूर विनोद कावरा रा. मोरगाव घटनास्थळी बराच वेळ पडून असल्याने त्यांना कोणीही उचललेले नसून फक्त उपस्थित नागरिकांनी त्याचे मोबाईल द्वारे फोटो शुटींग काढले असल्याची प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले.

त्यामुले त्या ठिकानी बराच वेळ खितपत पळत होते.परंतु या ठिकाणी रुग्णवाहिकेचे चालक जिवन इंगळे, मंगेश जंजाळ,डॉ मुदतशीर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्यांनीच गँभिर असलेल्या दुचाकीस्वार यांना उचलून रुग्णवाहिकामध्ये ( १०८) अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले.वृत्त लिहेपर्यत पोलीस चौकीला कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: