Monday, December 23, 2024
Homeराज्यदिग्रस बु येथील उघडे विद्युत रोहित्र पेटले...

दिग्रस बु येथील उघडे विद्युत रोहित्र पेटले…

युवकांनी सतर्कता ठेवल्याने आग विझवून आटोक्यात आणली, महावितरण चे दुर्लक्ष

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील सस्ती महावितरण अंतर्गत दिग्रस बु बसस्थानक ते गाव पर्यत जात असलेल्या रस्त्यावरील विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.तर पेट घेतलेल्या रोहित्रावर युवक संदेश गवई व सहकारी यांनी विद्युत रोहित्रावर माती टाकून आग आटोक्यात आणण्यात आली.

संबधित विभागाला संपर्क साधून काही वेळ विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी सांगण्यात आले. तसेच या विद्युत रोहित्र आटोक्यात आणले.काही वेळ जाणारे येणारे भाविक घाबरत होते.सुदैवाने जीवित हानी झाली नाही.तरी महावितरण विभागाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणचे उघडे रोहित्र सुरळीत करून घ्यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे जनेकरून अनुचित घटना घडू नये .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: