गडचिरोली:
अहेरी उप प्रादेशिक आ.वि महामंडळ विभागांतर्गत धान खरेदी केली जाते त्यानंतर भरडाई (मिलिंग) प्रक्रियेकरिता धान राईस मिल मध्ये पाठविल्या जातो या प्रक्रियेमध्ये धानाचे ट्रक राईस मिल मध्ये न पोहोचविता या धानाला बाहेरील राज्यांमध्ये उदा .आंध्र,तेलंगाना आणि छत्तीसगड मध्ये विकल्या जातो आणि तिथूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे खाण्या अयोग्य तांदूळ राईस मिल कंत्राटदारच्या माध्यमाने शासकीय अन्न साठवण डेपो मध्ये पाठविला जातो मग हाच निकृष्ट दर्जाचा तांदूळ जनतेसाठी उपलब्ध केला जात आहे.
सदर अन्नधान्याची गुणवत्ता नियंत्रण तपासणी करूनही गोडाऊन व्यवस्थापक व मिल्स मालक यांच्या संगमताने हि अफरातफरी चालू आहे .अशी सर्वत्र चर्चा आहे आणि शिल्लक धान्य भरडाई (मिलिंग ) करीत जवडील (चामोर्शी इत्यादी ) केंद्रावर न पाठविता सरळ २०० किलोमीटरचा पल्ला गाठून आरमोरी किंवा वडसा येथे पाठविण्यात येत आहे.तसेच आरमोरी तालुक्यातील बेलनवाडी-दवंडी-पुरंडी केंद्राचे धान ( मिलिंग) भरडाई करीत आरमोरी २६ किलोमीटर किंवा वडसा ४५ किलोमीटर केंद्रकळे न पाठविता हा माल सरळ ३०० किलोमीटरचा पल्ला गाठून सिरोंचा तालुक्यात पाठविण्यात येत आहे .हा शेकडो किलोमीटरची अतिरिक्त वाहतूक का केला जात आहे ? इथे स्पष्ट वाहतूक घोटाळा चालू आहे असे निदर्शनात येत आहे.
अफ़रातफ़रील थांबविण्याकरिता धान वाहतुकीच्या वाहनावर GPS मशीन बसविण्यात यावी आणि या महाघोटाळ्यात कारणीभूत अधिकार आणि राईस मिल मालक यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच उच्च स्तरीय चौकशी बसवून दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा.अन्यथा अहेरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असे प्रतिपादन अहेरी तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ निसार हकीम ,रज्जाक पठाण , नामदेव आत्राम,मधुकर (बबलु) सडमेक, राघोबा गौरकर,अशोक आईंचवार, हनिफ शेख यांच्या उपस्थितीत मा .उपविभागीय अधिकारी अहेरी यांना निवेदन देवून प्रतिलिपी मा. उपमूख्यमंत्री म. रा. व पालक मंत्री गड , मा. आदिवासी विकास मंत्री म. रा. , मा. प्रधान सचिव आदिवासी विभाग म. रा. ,मा. विभागीय आयूक्त आदिवासी विभाग नागपूर मा. जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना देण्यात आले.