Monday, December 23, 2024
Homeराज्यट्रॅक्टर अंगावर चढवुन केला जिवे मारण्याचा प्रयत्न - नगरधन येथील घटना,...

ट्रॅक्टर अंगावर चढवुन केला जिवे मारण्याचा प्रयत्न – नगरधन येथील घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

रामटेक – राजू कापसे

पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत १० कि. मी अंतरावर येणाऱ्या मौजा नंदापुरी येथे दिनांक १४ जुन दुपारी २.१५ वाजता दरम्यान रामेश्वर मदनकर वय ४५ वर्ष, रा. नंदापुरी ता. मौदा यांना आरोपी नामे सुधाकर घुसाराम मदनकर, रा. नंदापुरी याने धडक देत अंगावर ट्रॅक्टर चढवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

रामेश्वर आणि आरोपी सुधाकर हे नातेवाईक असुन एकाच गावात राहतात. दिनांक १४ जुन रोजीचे दुपारी सव्वादोन वाजता दरम्यान आरोपी सुधाकर मदनकर यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर रामेश्वर मदनकर यांच्या अंगावर आणुन त्यांना धडक देवुन अंगावर नेवुन उद्देषपुर्वक जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच रामेश्वर यांची पत्नी ही तिच्या पतीकडे म्हणजेच रामेश्वर कडे धावत गेली असता तिला सुध्दा आरोपीने ट्रॅक्टरने जिवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादी नंदा रामेश्वर मदनकर यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. रामटेक येथे कलम ३०७, ३२४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के हे करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: